आभार Print E-mail
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर   

मराठी वाङ्‌मय मंडळाच्या न्यू इंडिया सेंटर येथील विस्तारीत शाखेची वेबसाईट करायचं स्वप्न पाहिलं काही वेड्या मित्रांनी. प्रसाद, राजेश, राजन, रत्ना मॅडम, निशिगंधा अशी त्या वेडपट मित्रांची नावं. सुरवातीला सारं काही अशक्य वाटलं होतं. पण आमचा जनसंपर्क आमच्याकामी आला आणि चिन्मयी इन्फोटेक च्या सहकार्याने ही वेबसाईट तयार होऊ शकली. 

ह्या वेबसाईटचा सारा खर्च चिन्मयी इन्फोटेक ने उचलला आहे.  मराठी वाङ्‌मय मंडळाच्या न्यू इंडिया सेंटर येथील विस्तारीत शाखेच्या पदाधिका-यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.  चिन्मयी इन्फोटेक (www.chinmayeeinfotech.com) ही कंपनी जनरल इंश्योरंस मध्ये कार्यरत असणा-या प्रोफेशनल्सना वेगाने काम करता यावे यासाठी सेवा पुरवते.  वेब साईट तयार करणे तसेच विभिन्न सॉफ्टवेयर्स तयार करणे या कामांमध्ये या कंपनीचा हातखंडा आहे. ही कंपनी विविध कंपन्यांना त्यांचे संगणक केऩ्द्र तयार करण्यासाठी मार्गदर्शन ही करते.

तसेच रॉकेट थिम्स ह्या कंपनीचाही आम्हाला आधार मिळाला आहे.

मंडळाचे सर्व सभासद तसेच पदाधिकारी वरील दोन्ही कंपन्यांचे आभारी आहेत.

अन्य सामाजिक संस्थांप्रमाणे विस्तारित शाखेला ही पाठिराख्यांचे पाठबळ आहे.

  • अँथोनी मोटर गॅरेज
  • श्री दिपक ध्रुव
  • श्री यू बी कदम
  • सौ. रत्ना हिले
  • सौ. उज्वला लाड
  • श्री सत्यवान वस्कर
  • सौ.विभावरी मूळे
  • श्री सुनिल खोत
  • सौ. प्रिया चव्हाण

पुस्तकांचे अनुदान दिलेल्या वरील व्यक्तिंचे / कंपनीचे आम्ही आभार मानतो.

या वेबसाईट वर आपले लेख विनामूल्य प्रकाशित करण्यास परवानगी दिलेल्या खालील मान्यवरांचे  आम्ही आभार मानतो :

  • सौ. ज्ञानदा नाईक
  • मेधा नाखरे  Owner of – ज्ञानार्जन - साहित्य देवाणघेवाण कम्युनिटी - Orkut
 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates