ऋतुचक्र पुस्तकातील उतारा - (चैत्रसखा वैशाख) Print E-mail
यांच्या द्वारा - संकलन : शकुंतला मुळये - लोकसत्ता   

ASian_Paradise_Flycather

Asian Paradise Flycatcher (Terpsiphone paradisi) शाही बुलबुल

वसंतातल्या सा-या फुलांना शब्द असते तर ते कसे असते, असे मला कुणी विचारले, तर मी बुलबुलकडे बोट दाखवीन. बुलबुलाचा शब्द आनंदाने भरलेला, कणखर उत्साहाने दाटलेला. वासंतिक गंधसृष्टीचे प्रातिनिधिक मदनबाण, तसेच नादविश्वाचे, बुलबुलाचे आखूड वसंतसंगीत.

बुलबुलाच्या मागोमाग तांबट पक्ष्याचा टणत्कार हवेत घुमतो. भर दुपारी त्याला नुसती धार येते. वेडा राघूही विचित्र आवाज करीत कोलांटय़ा घेतो. फुलचुख्यांच्या मधुर, आनंदी आलापिका तर दिवसभर वाऱ्यावर वाहतच असतात. गोविंद पक्षीदेखील याच महिन्यात अति करुणरम्य गीत गातात आणि पिसे फुलवून नाचतात.

तपकिरी रंगाचे पिवळे पट्टे असणारे कांचन किंवा पीलक पक्षी याच दिवसांत दर्शन देतात. कोकणातले लोक त्यांना रामबाण म्हणतात. सावरीचे झाड त्यांचे आवडते. सूर्याच्या आगीत अक्षरश: भाजून निघालेला पण अंगावर फुलपाखरांप्रमाणे भरगच्च सौंदर्यचिन्हे- रूपाची, नादाची व सुगंधाची धारणा करणारा, चैत्रसखा वैशाख हा असा आहे.

(ऋतुचक्र - दुर्गा भागवत)

संकलन : शकुंतला मुळये - लोकसत्ता

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates