|
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर
|
|

श्रीमती रत्ना हिले ह्या सध्या कल्याण D.O. - 170500 (MRO-V) इथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्या न्यू इंडिया सेंटर, मुंबई इथे टाईड कार्यालयात होत्या. त्यांना वाचन, संगीत आणि कविता, कथा, बालवाङ्मय वगैरे वगैरे (थोडक्यात साहित्याबद्धल रुचि आहे ) ची ही आवड आहे. त्यांनी सुगम संगीताच्या परीक्षाही दिलेल्या आहेत.
त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. कुठच्या तरी जून्या पूराण्या वहीमध्ये कविता लिहिता लिहिता यांना अचानक ब्लॉग चा साक्षात्कार झाला. ब्लॉग चे साधन हातात आल्यावर ह्या मुक्त लिहू लागल्या. श्रीमती रत्ना हिले यांनी आपला ब्लॉग अतिशय छान सजवला आहे. http://ratnahile.blogspot.com या संकेत स्थळावर आपण ह्यांच्या कविता वाचू शकाल.
एवढ्या वर थांबतील तर त्या रत्ना हिले कसल्या. इंटरनेट चे ओ का ठो कळत नसताना देखिल चुकत माकत त्यांनी इंटरनेट चे सर्व बारकावे हस्तगत केले आणि आज याच वेबसाईट च्या संपादिका बनून www.mvmnia.com चालवत आहेत. वेबसाईट मी तयार केली आहे पण वेबसाईट वाचनीय बनवण्याचं श्रेय श्रीमती रत्ना हिले यांना आहे.
|