श्रीमती प्राजक्ता साखरकर Print E-mail
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर   

श्रीमती प्राजक्ता साखरकर या प्रधान कार्यालयात गुंतवणूक विभागात काम करतात. खरं तर ह्यांचा असा अहो जाहो करून परिचय देणं मला जरा कठिण होतय. (माझी बायको आहे ही !)  ह्या वेबसाईट साठी खुपच खर्च येणार होता. सर्व मध्यमवर्गीयां प्रमाणे आमचे ही पगारावरच चालते. अशा परिस्थितीत ऐन नवरात्री च्या आधी स्वतःसाठी काही खरेदी करायच्या ऐवजी प्राजक्ताने मला जवळपास २०,०००/-  रुपये फक्त माझ्या मराठी वरील प्रेमाला समजुन ही वेबसाईट तयार करण्यासाठी दिले. आज ही वेबसाईट मराठीप्रेमींसाठी सुरू होऊ शकली ती केवळ श्रीमती प्राजक्ता प्रसाद साखरकर यांच्यामुळे.

स्वतःच्या पत्नीचे कौतुक म्हणून नव्हे तर  सर्व मित्र-मैत्रिणींना कळावं की ही अशी वेबसाईट फक्त माझ्या अक्कलहुशारीने नाही होत तर तीच्यामागे एका तेजस्वीनीचं बळ आहे. ही वेबसाईट करताना ब-याच वेळा मी हिंमत हारली होती पण पाठिवर आश्वासक हात होता प्राजक्ताचा.

ह्या माझ्या शक्तिला... माझ्या प्राजक्ताला माझा सलाम

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates