|
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर
|
|
नमस्कार रसिक वाचकहो, मराठी वाङ्मय मंडळाच्या न्यू इंडिया सेंटर येथील विस्तारित शाखेची ही वेबसाईट आहे. ही वेब साईट न्यू इंडिया सेंटर येथील सर्व सभासदांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे पण ह्या साईटचा आनंद सर्व मराठी प्रेमी घेऊ शकतात. सध्याच्या संगणक युगात मराठी वाङ्मय मंडळाच्या न्यू इंडिया सेंटर येथील विस्तारित शाखेने हे पहिले पाऊल उचलले आहे. सर्व प्रकारचे लेख उदा. प्रवासवर्णनं, ललित, कथा ह्यांचं आम्ही स्वागत करू. सभासदांच्या लेखनाला उत्तेजन देणं हा या साईटचा मूळ हेतू आहे. नेट वर इतरत्र वाचलेले चांगले लेख व इतर साहित्य प्रकारांचही स्वागत आहे. पण असे लेख देताना मूळ वेबसाईट चा तसेच लेखकांचा जरूर उल्लेख असावा. उत्तमोत्तम मराठी साहित्य आपल्या सभासदांना वाचावयास मिळावं हा एक महत्वाचा हेतु ही वेबसाईट तयार करताना आहे. आम्ही सर्व सभासदांना आवाहन करत आहोत की त्यांनी आपले सहकार्य आम्हाला करावे. ह्या वेबसाईट साठी वेळ देणा-या लोकांची आम्हाला अत्यंत गरज आहे. ज्या सभासदांना शुद्धलेखनाची जाण असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा. या व्यक्तिंना ह्या वेबसाईट साठी लेख लिहायचे असतील त्यांनी कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
This e-mail address is being protected from spambots, you need JavaScript enabled to view it वर संपर्क साधावा. फक्त यूनिकोड एनकोडींग वापरून लिहिलेला लेख ग्राह्य धरला जाईल. यूनिकोड च्या स्थापनेसाठी कृपया Font Problem हे मुख्य पानावरील सदर वाचावेआपल्या सुचना, प्रतिसाद, शिव्याशाप कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ह्या ईमेल वर पाठवाव्यात.
|