या सदरासाठी न्यू इंडियातील निवृत्त तसेच सध्याचे कर्मचारी या सर्वांना आवाहन आहे कि त्यांनी आपल्या रचना आमच्याजवळ यूनिकोड एनकोडिंग मध्ये तयार करून पाठवाव्यात. तसेच जे सभासद आपल्या मंडळाकडे असलेले साहित्य, कथा वगैरे यूनिकोड मध्ये तयार करून देऊ शकतील त्यांनी कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
किंवा
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वर संपर्क साधावा. आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.
|
|
यांच्या द्वारा - श्रीपाद कोठे, नागपूर
|
 मी उगाच भटकत होतो वाळूच्या शांत समुद्री मौनाला बिलगून गेली मौनाची नाजुक गाणी
अवकाश मोकळे झाले अंतरात गुदमरलेले दु:खाच्या पाऊलखुणांनी गालावर ओघळलेले
नभी चंद्र जरासा तुटका वा-याने हालत नाही शपथांच्या स्मरणधुळीने आभाळ कोंदुनी जाई
हे असेच काहीबाही फुलणा-या झाडाजैसे गळणा-या पानांनाही का टोचत असतील काटे?
गाण्याचे दु:ख सुकोमल दु:खाचे गाणे भोळे दूरस्थ चांदणीचेही का भरून येती डोळे?
मातीचा स्पर्शच हळवा वाळूत कसा गवसावा भाळावर गोंदवलेला आलेख कसा मिटवावा?
- श्रीपाद कोठे, नागपूर रविवार, २५ डिसेंबर २०११
|
|
|
यांच्या द्वारा - तुकाराम धांडे
|
|
तुकोबा तुला मानलं खरंच तुकोबा तुला मानलं नय म्हंजे, मी काय तुही गाथाय वाचली नय तुव्हा एखांदा अभंगही मव्हा तोंडपाठ नय पण, तू डोंगराव जायाचा ना?..भंडार्याच्या तिठली झाड-वेली, पशू-पक्षी किडा-मुंगी याला तू सोयरा मानलं ना बस्स...
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - अनन्त काणेकर
|
|
दिवाळी, तो आणि मी
दीपांनी दिपल्या दिशा! सण असे हा आज दीपावली हर्षांने दुनिया प्रकाशित दिसे आंतूनि बाहेरुनी! अंगा चर्चुनि अत्तरें, भरजरी वस्त्रांस लेवूनियां, चंद्रज्योति फटाकडे उडविती आबाल सारेजन!
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - अनुराधा म्हापणकर
|
|

उन्हे उलटता, सांजवेळी,,,श्रावण ओल्या घनात ग दाटून आले आभाळ सारे...पावसाच्या काय मनात ग...
|
|
आणखी वाचा...
|
|
यांच्या द्वारा - कवी : उपेंद्र चिंचोरे
|
|

भारतीयांच्या स्वामित्वाचा, क्रिकेट मानदंडक | एक लक्ष्य ते, भारत जिंको, विजयी विश्वकरंडक ||ध्रु.||
प्रतिस्पर्धी जे, कुणीही येवो , धावुनी, सरसावूनी, दाणादाण उडवून देवू, धाडू झणी परतुनी, झुंज देऊ या, आज रिपूला, मैदानी बेधडक, एक लक्ष्य ते, भारत जिंको, विजयी विश्वकरंडक ||१||
|
|
आणखी वाचा...
|
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
|
JPAGE_CURRENT_OF_TOTAL |