रिमझिम रिमझिम झिरमिरती...इवलेइवले तुषार ग...हळूच मागून खोडी काढी ...वारा किती हुशार ग...उघडीप झाली मेघाआडूनी...तळ्यात चमचम बिंब ग...तिरिप कोवळी पिवळीपिवळी...पानांत टपटप थेंब ग...श्रावण सा-या चराचरांत...नवचैतन्याचा पूर गअलगद जैसे मनात कोणी...छेडत राही सूर ग...
अनुराधा म्हापणकर
Site Global Marathi
Username
Password
Remember Me