|
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली झाली फुले कळयांची झाडे भरास आली जेव्हा..... दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले कैफात काजव्यांची अन् पालखी निघाली झाली फुले कळयांची... झाडे भरास आली जेव्हा .....
नव्हतेच शब्द तेव्हा मौनात अर्थ सारे स्पर्शात चन्द्र होता स्पर्शात लाख तारे स्पर्शात लाख तारे... ओथंबला फुलानी अवकाश भोवताली झाली फुले कळयांची झाडे भरास आली जेव्हा .... केसातल्या जुईचा तिमिरास गंध होता श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता आवेग अंध होता... वेड्या समर्पणाची वेडी मीठी मिळाली झाली फुले कळयांची झाडे भरास आली जेव्हा .... संकलन - श्रीमती रत्ना हिले
|