या सदरासाठी न्यू इंडियातील निवृत्त तसेच सध्याचे कर्मचारी या सर्वांना आवाहन आहे कि त्यांनी आपल्या रचना आमच्याजवळ यूनिकोड एनकोडिंग मध्ये तयार करून पाठवाव्यात. तसेच जे सभासद आपल्या मंडळाकडे असलेले साहित्य, कथा वगैरे यूनिकोड मध्ये तयार करून देऊ शकतील त्यांनी कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
किंवा
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वर संपर्क साधावा. आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.
दि. ४ आणि ५ फेब्रुवारीला आम्ही (मी, माझी लेक प्राजक्ता आणि ऑफिस मधील मैत्रीण नीता) 'भिगवण' ला जाऊन आलो.
' Nature इंडिया ' या निसर्गाशी बांधिलकी मानणा-या, निसर्गावर भरभरून प्रेम करणा-या group (आदेश शिवकर, मंदार खाडीलकर आणि आमच्या सारख्या ) इतरांसोबत पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला. शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी ही पक्ष्यांची दुनिया. त्यांचे आकार अगदी वेगवेगळे..काही समोर सहज दिसणारे तर काही फक्त scope मधूनच व्यवस्थित दिसू शकणारे..त्यांचे सुंदर रंग, पिसांचा मुलायमपणा, उभी राहण्याची, चालण्याची नजाकत, त्यांच्या उत्तुंग भरा-या सगळेच अविस्मरणीय...आज तेथून परत येऊन एक आठवडा होऊन गेलाय पण मन अजूनही 'भिगवण' लाच आहे..
मंगोलिया, सैबेरिया, हिमालयातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले हे पक्षी म्हणजे निसर्गाची किमया आहे..तिथली कडाक्याची थंडी, अन्नाच्या शोधात हे पक्षी हा प्रवास करत असतात..तिथले हवामान त्यांना अनुकूल झाले की एप्रिल-मे मध्ये तेवढाच प्रवास करत ते परततात..
पुणे-सोलापूर रोडवर पुण्यापासून ११० किलोमीटर वर भिगवण वसलेले आहे. उजनी धरणाचे पाणी या भागापर्यंत आले आहे..ही जागा स्थलांतरित पक्ष्यासाठी संरक्षित क्षेत्र आहे..ही जागा जवळजवळ १८००० हेक्टर असून डिसेंबर ते फेब्रुवारी हा पक्षीनिरीक्षणासाठी उत्तम काळ आहे. पक्षीनिरीक्षणासाठी इथे अनेक जागा आहेत पण 'डिकसळ आणि कुंभारगाव' येथे जास्त पक्षीवैविध्य आढळते आणि इथे सहज पोहचता येणेही शक्य आहे.
भिगवण येथे राहण्याची चांगली सोय नसल्याने येथून २३ किलोमीटर वर असलेल्या बारामती येथे रात्रीचा मुक्काम करावा लागला..बारामती म्हणजे साखर कारखाने..या प्रवासात रस्त्याने उस घेऊन जाणा-या गाड्या, मधेच २००-३०० मेंढ्या घेऊन प्रवास करणारी मेंढपाळ कुटुंब..अशी वेगवेगळी दृश्ये मन:पटलावर उमटली होती..पण आपली अमीट छाप सोडली होती ती या 'गोड' पक्ष्यांनी..त्यांचे काही फोटो इतर छायाचित्रकारांचे आणि चित्रफिती माझ्या लेकीच्या..
.
.
Common Coot - (कपाळावर पांढरा टिळा असल्याने त्याला 'वारकरी' असेही म्हणतात
खास प्रतिनिधी, ठाणे केवळ स्वत:पुरते सिमीत आणि सहसा इतर कुणाशीही देणेघेणे नसणारे सर्वसामान्यांचे जगणे निराश तसेच अस्वस्थ करणारे असले तरी या परिस्थितीचे खोलवर विश्लेषण करणारे वाङमय मराठी साहित्यात फारसे निर्माण होत नसल्याची खंत सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि चंद्रपूर येथे होणाऱ्या ८५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी शनिवारी सायंकाळी येथील एका समारंभात व्यक्त केली.
ठाणेकरांतर्फे ग्रंथालयाचे अध्यक्ष मा.य.गोखले, सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना मराठी वाङमय परंपरेत काही चांगल्या कलाकृती निर्माण झाल्या असल्या तरी ज्याला विलक्षण किंवा थोर म्हणता येईल, असे काही निर्माण झाले नसल्याची कबुलीही डहाके यांनी दिली.
आपले अवघे जीवन आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक चौकटींमध्ये कटिबद्ध आहे. मात्र या साऱ्या चौकटींमध्ये मानवी अनुभवांना काही स्थान आहे का याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मानवाची स्वातंत्र्याची मुलभूत प्रेरणा नाकारणारी आणीबाणी अनुभवूनही त्याचे यथार्थ प्रतिबिंब मराठी साहित्यात उमटलेले दिसत नाही. तसेच विदर्भातील शेतकरी एवढय़ा मोठय़ा संख्येने आत्महत्या का करतात, याचा तळाशी जाऊन शोध घेतलेला आढळून येत नाही.
परिणामी वर्तमान सामाजिक वास्तवाचे फारच ढोबळ आणि स्थूल दर्शन बहुतेक मराठी साहित्यकृतींमधून घडते, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. त्याआधी आजच्या काळातील वाङमयाची समीक्षा करणारा महाकवी, अशा शब्दात प्रा. अशोक बागवे यांनी प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी ओळख करून दिली.
मराठी ग्रंथ संग्रहालय-ठाणे या संस्थेने ११३ व्या वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून आयोजित या समारंभात रेगे वाङमयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यंदा किरण येलेंच्या ‘बाईच्या कविता' आणि महेंद्र कोंडे यांच्या ‘बावनकशी' या दोन काव्यसंग्रहांना ललित विभागातील पुरस्कार विभागून देण्यात आला. ललितेतर विभागाचा पुरस्कार डॉ. अनंत देशमुख यांना त्यांच्या ‘र. धों. कर्वे-व्यक्तित्त्व आणि कर्तृत्त्व' संशोधनपर ग्रंथासाठी देण्यात आला.
मराठी वाड.मय मंडळातर्फे आपले सहकारी श्री. किरण येले (मुख्य कार्यालय - मुंबई, फोर्ट विभाग) यांना हार्दिक शुभेच्छा !
आपले सहकारी श्री. सुनील जगदाळे (MRO III - R.O.) यांच्या पहिल्या काव्य संग्रहाचे (चारोळी संग्रहाचे) प्रकाशन आपल्या New India Centre मधील तिस-या मजल्यावरील MRO-III च्या बैठक कक्षात दिनांक ८.१२.२०११ रोजी छोटेखानी समारंभात पार पडले.
उपस्थित पाहुणे आणि सुनीलचा मित्रपरिवार, हितचिंतकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. शिरीष बेळगावकर यांनी केले.
प्रत्येकजण आपले जीवन जगताना, काहीतरी वेगळ करण्यासाठी धडपडत असतो..असे असताना खूप कमी व्यक्ती आपल्या आवडत्या छंदाला वाव देतात आणि आपल्या गुणांना लाकांसमोर घेऊन येतात. आपले सहकारी श्री. सुनील त्यापैकी एक आहे. सुनील बद्दल सांगायचे झाले तर सुनील अभिनय, नृत्य करतो, चांगला गातो, भजनात तबला वाजवतो, computer expert, mobile repair करतो, चित्रकार आणि आणखीही काही काही..अशा या सुनीलची आणखी एक नवीन बाजू म्हणजे काव्यरचना..
ऑफिस मध्ये Accounts सारख्या शुष्क विभागात काम करता करता आणि प्रवासात लोकलच्या खडखडाटातही कविता स्फुरणे हे दाखवतंय की त्याच्या मनाच्या आत खूप काही दडले आहे, जे तो शब्दात उतरवू पाहत आहे आणि त्याच तरल भावनांचे मूर्त स्वरूप म्हणजे त्याचा हा पहिला काव्यसंग्रह..
MRO III चे Regional Manager श्री. मैत्र साहेब सुनिल विषयी बोलताना म्हणाले की 'खरंच आजचा हा अतिशय आनंदाचा प्रसंग आहे. फार कमी वेळा असा प्रसंग येतो की आपल्या मायबोलीमध्ये, मातृभाषेत कोणीतरी कार्य करतो आणि त्याचे कौतुक होते. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आपल्या कंपनीत होत आहे हा मला फार आनंदाचा आणि कौतुकाचा विषय वाटतो. ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेला आमृतातेही पैजा जिंके असे म्हटले आहे. अमृतापेक्षाही गोड अशी अवीट जिची गोडी आहे त्यात त्याने कार्य केलंय..आपल्या भाषेचा थोडासा उपकार, परतफेड सुनील ने केली आहे.
इतरही मान्यवरांनी सुनील विषयी बोलून त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आणि पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
आपल्या मराठी वाड.मय मंडळातर्फे सुनीलला त्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा !
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it