प्राजक्तखुणा...( रत्ना हिले ) Print E-mail
यांच्या द्वारा - सौ. रत्ना हिले - ( कल्याण डी. ओ. १७०५०० )   

radha

माझी अगतिकता
तुझा समंजसपणा...
दोघांच्या मनात जपलेल्या
हळव्या प्राजक्तखुणा...

आता तुझा मार्ग वेगळा
अन तसाच माझाही...
नियतीने वाटेवर शिंपलेला
मृगजळाचा सडा...

कुठली भेट अपूर्ण होती
भेटलो असे वळणवाटेला...
एकमेकांचे आभास असे
जन्मभर सोबतीला...

ती उत्कटता...ती ओढ़
कालप्रवाहात ओसरून गेली...
तळहातावरी परि
अजुन स्पर्श जपलेला...

तुझ्या मीठीत विरघळलेल्या क्षणांच्या
चांदण्या आभाळभर...
त्यांचेच गीत गाते
तुझी वेडी राधा....

कृष्णा ये ना...
कृष्णा ये ना...
ये ना...s .. s.. s..

 

सौ. रत्ना हिले - ( कल्याण डी. ओ. १७०५०० )

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

खुपच अप्रतिम रत्नाजी .....

फ़क्त भक्तीची पुढची पायरी सगुणातून निर्गुणाकडे जाउ दे.....बाकी नामांकीत.

With best regards,

ओंकार नेर्लेकर  - पुणे

 
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates