|
यांच्या द्वारा - रत्ना हिले
|
|
.
|| पुस्तक प्रकाशन सोहळा ||
"जोड शब्दांची"
(चारोळी संग्रह)
सुनील जगदाळे
प्रमुख पाहुणे
श्री. दयानंद कल्याणपूर
श्री. आर. अत्तियप्पन
श्री. व्ही. के. जैन
डॉ. विलास मैत्र
श्री, विजय आगटे
डॉ. अमरीश सिन्हा
श्री. शिरीष बेळगावकर
आणि मित्रपरिवार
आपले सहकारी श्री. सुनील जगदाळे (MRO III - R.O.) यांच्या पहिल्या काव्य संग्रहाचे (चारोळी संग्रहाचे) प्रकाशन आपल्या New India Centre मधील तिस-या मजल्यावरील MRO-III च्या बैठक कक्षात दिनांक ८.१२.२०११ रोजी छोटेखानी समारंभात पार पडले.
उपस्थित पाहुणे आणि सुनीलचा मित्रपरिवार, हितचिंतकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. शिरीष बेळगावकर यांनी केले.
प्रत्येकजण आपले जीवन जगताना, काहीतरी वेगळ करण्यासाठी धडपडत असतो..असे असताना खूप कमी व्यक्ती आपल्या आवडत्या छंदाला वाव देतात आणि आपल्या गुणांना लाकांसमोर घेऊन येतात. आपले सहकारी श्री. सुनील त्यापैकी एक आहे. सुनील बद्दल सांगायचे झाले तर सुनील अभिनय, नृत्य करतो, चांगला गातो, भजनात तबला वाजवतो, computer expert, mobile repair करतो, चित्रकार आणि आणखीही काही काही..अशा या सुनीलची आणखी एक नवीन बाजू म्हणजे काव्यरचना..
ऑफिस मध्ये Accounts सारख्या शुष्क विभागात काम करता करता आणि प्रवासात लोकलच्या खडखडाटातही कविता स्फुरणे हे दाखवतंय की त्याच्या मनाच्या आत खूप काही दडले आहे, जे तो शब्दात उतरवू पाहत आहे आणि त्याच तरल भावनांचे मूर्त स्वरूप म्हणजे त्याचा हा पहिला काव्यसंग्रह..
MRO III चे Regional Manager श्री. मैत्र साहेब सुनिल विषयी बोलताना म्हणाले की 'खरंच आजचा हा अतिशय आनंदाचा प्रसंग आहे. फार कमी वेळा असा प्रसंग येतो की आपल्या मायबोलीमध्ये, मातृभाषेत कोणीतरी कार्य करतो आणि त्याचे कौतुक होते. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आपल्या कंपनीत होत आहे हा मला फार आनंदाचा आणि कौतुकाचा विषय वाटतो. ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेला आमृतातेही पैजा जिंके असे म्हटले आहे. अमृतापेक्षाही गोड अशी अवीट जिची गोडी आहे त्यात त्याने कार्य केलंय..आपल्या भाषेचा थोडासा उपकार, परतफेड सुनील ने केली आहे.
इतरही मान्यवरांनी सुनील विषयी बोलून त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या आणि पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला.
आपल्या मराठी वाड.मय मंडळातर्फे सुनीलला त्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा !
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सौ. रत्ना हिले - संपादिका
|