दि. ४ आणि ५ फेब्रुवारीला आम्ही (मी, माझी लेक प्राजक्ता आणि ऑफिस मधील मैत्रीण नीता) 'भिगवण' ला जाऊन आलो.
' Nature इंडिया ' या निसर्गाशी बांधिलकी मानणा-या, निसर्गावर भरभरून प्रेम करणा-या group (आदेश शिवकर, मंदार खाडीलकर आणि आमच्या सारख्या ) इतरांसोबत पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला. शब्दात व्यक्त करता येणार नाही अशी ही पक्ष्यांची दुनिया. त्यांचे आकार अगदी वेगवेगळे..काही समोर सहज दिसणारे तर काही फक्त scope मधूनच व्यवस्थित दिसू शकणारे..त्यांचे सुंदर रंग, पिसांचा मुलायमपणा, उभी राहण्याची, चालण्याची नजाकत, त्यांच्या उत्तुंग भरा-या सगळेच अविस्मरणीय...आज तेथून परत येऊन एक आठवडा होऊन गेलाय पण मन अजूनही 'भिगवण' लाच आहे..
मंगोलिया, सैबेरिया, हिमालयातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले हे पक्षी म्हणजे निसर्गाची किमया आहे..तिथली कडाक्याची थंडी, अन्नाच्या शोधात हे पक्षी हा प्रवास करत असतात..तिथले हवामान त्यांना अनुकूल झाले की एप्रिल-मे मध्ये तेवढाच प्रवास करत ते परततात..
पुणे-सोलापूर रोडवर पुण्यापासून ११० किलोमीटर वर भिगवण वसलेले आहे. उजनी धरणाचे पाणी या भागापर्यंत आले आहे..ही जागा स्थलांतरित पक्ष्यासाठी संरक्षित क्षेत्र आहे..ही जागा जवळजवळ १८००० हेक्टर असून डिसेंबर ते फेब्रुवारी हा पक्षीनिरीक्षणासाठी उत्तम काळ आहे. पक्षीनिरीक्षणासाठी इथे अनेक जागा आहेत पण 'डिकसळ आणि कुंभारगाव' येथे जास्त पक्षीवैविध्य आढळते आणि इथे सहज पोहचता येणेही शक्य आहे.
भिगवण येथे राहण्याची चांगली सोय नसल्याने येथून २३ किलोमीटर वर असलेल्या बारामती येथे रात्रीचा मुक्काम करावा लागला..बारामती म्हणजे साखर कारखाने..या प्रवासात रस्त्याने उस घेऊन जाणा-या गाड्या, मधेच २००-३०० मेंढ्या घेऊन प्रवास करणारी मेंढपाळ कुटुंब..अशी वेगवेगळी दृश्ये मन:पटलावर उमटली होती..पण आपली अमीट छाप सोडली होती ती या 'गोड' पक्ष्यांनी..त्यांचे काही फोटो इतर छायाचित्रकारांचे आणि चित्रफिती माझ्या लेकीच्या..
.
.
Common Coot - (कपाळावर पांढरा टिळा असल्याने त्याला 'वारकरी' असेही म्हणतात