|
यांच्या द्वारा - नीता फुलझेले - कल्याण डी. ओ. १४१८००
|
|

तुझ्या माझ्या नात्यावर कविता करावी असं रूढार्थाने आपलं नातंच नाही... आणि आपलं नातं नक्की कोणतं हे अजूनही आपल्याला उमजलेलं नाही...
नकळत डोळ्यांतून व्यक्त होतं त्याला प्रेम म्हणायचं...की, ओठांवर येऊनही जे अव्यक्त आहे त्याला प्रेम म्हणायचं...
या प्रेमाला आस नाही स्पर्शाची, त्याला ओढ फक्त आपल्या सहवासाची.. तुझं माझं नातं मनाचं..मनाशी.. जपून ठेवीन तुझी आठवण या हळव्या मनाच्या तळाशी..
सख्या, माझ्या पुरतं मला हे उमजलं सांग कधी मलाही... जर का ते तुलाही समजलं...
( नीता फुलझेले - कल्याण डी. ओ. १४१८०० )
|