हास्यरंग
या सदरासाठी न्यू इंडियातील निवृत्त तसेच सध्याचे कर्मचारी या सर्वांना आवाहन आहे कि त्यांनी आपल्या रचना आमच्याजवळ यूनिकोड एनकोडिंग मध्ये तयार करून पाठवाव्यात.  तसेच जे सभासद आपल्या मंडळाकडे असलेले साहित्य, कथा वगैरे यूनिकोड मध्ये तयार करून देऊ शकतील त्यांनी कृपया This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it किंवा This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it वर संपर्क साधावा. आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.

माझ्या आवडी-निवडी - (प्रसाद साखरकर) Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   


(आपले सहकारी श्री. प्रसाद साखरकर यांनी आपल्या आवडी-निवडी सांगितल्या आहेत..सध्या उपलब्ध असलेली माहिती ही फारच त्रोटक असल्याने वाचकांनी त्यांना कंटाळा येईपर्यंत त्याच त्याच ओळी पुन्हा पुन्हा वाचाव्यात..अजून माहिती उपलब्ध होताच ती इथे update केली जाईल- संपादिका : सौ. रत्ना हिले )


मला चिंचेच्या स्वादाचे चॉकलेट फार आवडते. अजुन पर्यंत 2 प्रकार खाल्ले आहेत. आमच्या इथे "सहकारी भांडार" नावाचे दुकान आहे. तिथे मिळतात. पण मला सहकारी आवडत नाहीत. मला कावळे देखील आवडत नाहीत. कावळे खुपच काळे असतात. आमच्या इथे काळे नावाचे गृहस्थ होते. पण दिसायला ते गोरे होते. तरीही मला ते आवडायचे नाहीत. गोरे नावाचे सावळे गृहस्थ माझ्या ओळखीचे आहेत. पण ते मला आवडतात. सावळे नावाचे काळे गृहस्थ सिंहगड एक्सप्रेस मध्ये येतात ते पोस्टात आहेत. मला तेही आवडतात. पण मला पोस्टाचा ढिसाळ कारभार आवडत नाही. पण मला पोस्टमन आवडतो. सिंहगड एक्सप्रेस  पुण्याहून येते पण पुणेरी लोकं मला आवडत नाहीत. पुणेरी पाट्या मात्र आवडतात. पुण्याचा एकच माणूस मला आवडतो. बिनिवाले सर ! सर खुप छान आहेत. सर सर झाडावर चढणारी खार मला खुप आवडते. खार शेंगा खाते. मला शेंगा आवडतात. पण सगळ्यात जास्त मला चॉकलेट आवडते........... मला चिंचेच्या स्वादाचे चॉकलेट फार आवडते. अजुन पर्यंत 2 प्रकार खाल्ले आहेत.................



 


Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates