ललित
या सदरासाठी न्यू इंडियातील निवृत्त तसेच सध्याचे कर्मचारी या सर्वांना आवाहन आहे कि त्यांनी आपल्या रचना आमच्याजवळ यूनिकोड एनकोडिंग मध्ये तयार करून पाठवाव्यात.  तसेच जे सभासद आपल्या मंडळाकडे असलेले साहित्य, कथा वगैरे यूनिकोड मध्ये तयार करून देऊ शकतील त्यांनी कृपया This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it किंवा This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it वर संपर्क साधावा. आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.


शिशिरातली पानं.. गळणारी..( डॉ. राजेंद्र बर्वे ) Print E-mail
यांच्या द्वारा - डॉ. राजेंद्र बर्वे - लोकसत्ता   

तरळतात माझ्या खिडकीबाहेरी,
पानं गळणारी
शिशिरातली, लाल सोनेरी
येते सय तुझ्या ओठांची
आणि वसंतातल्या चुंबनांची
हात तुझे उन्हात ताम्बुसलेले     
आश्वस्त माझ्या हाती गुंफलेले
तू गेल्यापासून
रेंगाळतात दिवस लांबच लांब
आणि आता पडतील कानी
हिवाळ्यातली तीच गाणी
जुनी पुराणी
तू गेल्यापासून
विरहाने मन जात आहे गहिवरून
पण प्रिय, होते सारेच असह्य
हृदय भारी
जेव्हा तरळू लागतात
माझ्या खिडकीबाहेर तांबूस सोनेरी पाने

मित्रा, यूटय़ूबवर जाऊन या गाण्याचे मूळ इंग्रजी शब्द autumn leaves are falling लिही..  म्हणजे काही क्षणांत गाणे पाहता-ऐकता येईल. गाण्याचा व्हीडिओदेखील कमालीचा  देखणा आहे.  या गाण्याबद्दल बोलावे तितके थोडे! कविता नीट वाचलीस तर लक्ष्यात येईल की कवीचे  दु:ख तरल  आहे.. तो  विव्हळत नाहीये. प्रेयसीच्या आलेल्या आठवणीत फक्त मग्न आहे.

‘मौसम’ मधल्या गुलजारजींच्या ‘दिल ढूंढता है फुरसतके रात दिन..’ सारखा कवीचा  मूड आहे.  प्रिय व्यक्तीच्या वेगवेगळ्या ऋतूंमधल्या सहवासाची आठवण यावी आणि त्या मीठय़ा दर्दमध्ये आपण हरवून जावे, तसा अनुभव हे गाणे ऐकताना येतो.    

तिच्या विरहाची वेदना  तो भोगतो आहे. पण कशी? शिशिरातली  पानगळ पाहून  उन्हाने तांबुसलेल्या तिच्या हाताच्या स्पर्श त्याला आठवतो. त्याच्या एकटेपणात तिची आठवण त्याला सोबत करते आहे .
त्या दुखात डिग्निटी आहे.

हे डिग्निटी असलेलं दु:ख आपल्या मराठी कवितांमध्ये शोधताना पुन्हा सापडतात शिशिर ऋतूत गळणारी पानं.. बा. सी. मर्ढेकरांची ‘शिशिर्तुच्या पुनरागमे’ ही कविता, दुरावलेल्या प्रियेच्या बागेत ‘बकुलावली’ फुलली असल्याचं पाहते आणि ‘इवली सुकोमल पाखरे’ कुठे जाणार, असा प्रश्नही तिला विचारते. पण ही ‘कविता’ आहे,  आणि ऑटम लीव्ह्ज् हे गाणं!
अशा उत्कट तरीही संयत अविष्कारामुळे मनमोराचा पिसारा फुलतो..

डॉ. राजेंद्र बर्वे - लोकसत्ता
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
संकल्प.. एक ‘सोडणे’! - ( डॉ. राजेंद्र बर्वे ) Print E-mail
यांच्या द्वारा - डॉ. राजेंद्र बर्वे - लोकसत्ता   

resolution

दोन क्रियापदांची मला फारच गंमत वाटते. मराठी माणूस धंद्यात पडतो, उभं राहण्यासाठी पडतो आणि आणि कधीकधी आपल्या वृत्तीमुळे खरोखरच पडतो. तसंच दर वर्षांकरता, नव्या वर्षी आपण काही ना काही संकल्प सोडतो. म्हणजे धरण्यासाठी सोडतो आणि आपल्या वृत्तीमुळे खरोखरच सोडतो.

कदाचित समाजजीवनात आपले प्रतिनिधी आश्वासनं पाळत नाहीत, तसे खाजगी जीवनात आपण संकल्प पाळत नाही! गंमत आहे की नाही? नसेल वाटली तर द्या बुवा सोडून. ज्यांना जीवनातल्या लहानशा गोष्टींतदेखील गंमत दिसते, त्यांच्या मनमोराचा पिसारा फुलतो. ज्यांना दिसत नाही, त्यांचा पिसारा निमूट गप्प!

तर संकल्पाविषयी बोलत होतो. आता आईशप्पत खालील संकल्प कोणी वर्षभर पाळलेत का? खरं सांगा..

रोजच्या दिनक्रमाची डायरी न चुकता लिहायची
रोज हिशेब लिहायचा.. पर्स/पाकिटात नेमके किती पैसे होते? किती शिल्लक राहिले? कुठे खर्च केले आणि का केले? याची रुपये आणि पैशांत नोंद करायची.

प्रत्येक मिस्ड कॉलला लगेच कॉलबॅक करायचं.

आलेल्या पत्रं-ईमेलना ताबडतोब रिप्लाय धाडायचे. .. केलंय हे कधी ठरवल्याप्रमाणे नेमानं?

आता आणखी महत्त्वाचे संकल्प : ‘दिवसभरात, घरी आल्यावर कुटुंबियांवर चिडचिड करायची नाही’ किंवा ‘दारू, बिअर वा सिगारेट प्यायची नाही..’ वगैरे.

हे संकल्प केले आणि शंभर टक्के पाळले, असं छातीठोकपणे सांगणारे कुठे आहेत?

संकल्प करूच नका, असं नाही. माझं म्हणणं असंय की संकल्पांमागची सायकॉलॉजी समजून घ्या.

एक जानेवारीपासून किंवा वर्ष-प्रतिपदेला, वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा अगदी ‘येत्या सोमवारपासून’,  ‘पुढल्या एक तारखेला अमुक गोष्ट खात्रीने सोडणार किंवा सुरू करणार असं म्हणणाऱ्या लोकांना भरपूर शुभेच्छा घ्याव्या लागतात.
स्वत:च्या इच्छाशक्तीच्या बळावर ते आपापले संकल्प नक्कीच पार पाडू शकत नाहीत. चांगल्या कामाला आरंभ आणि वाईट कामांचा शेवट करायला मुहूर्त शोधायचा नसतो. शुभस्य शीघ्रं आणि अशुभस्य कालहरणं हेच खरं.

आणखी काही मानसिक पदर आहेत. संकल्प सोडणे हा आश्वासनं देण्यासारखा वेळकाढूपणाही ठरू शकतो. तर कधी संकल्प करताना आपण नेमकं काय करणार आहोत, हे ठरवलेलंच नसतं. प्रवासाला जाताना नेमकं ते गाव किंवा ठिकाण, पोहोचण्याचा मार्ग आणि त्यासाठी आवश्यक असणारी वाहनं यांची माहिती नको का? तसंच हे! येऊ शकणाऱ्या अडचणींची माहिती नाही  आणि त्यावर उपायही ठरलेले नाहीत, तोवर काही खरं नाही. खरंतर, संकल्पापेक्षा, तो पूर्ण करण्यात कोणते अडथळे येतील, त्यांच्यावर मात कशी करायची, याचं प्लॅनिंग करणं जास्त महत्त्वाचं.

असं सहसा होत नाही. करताही येत नाही.

कारण आपण संकल्प सिद्धीला नेणारे यंत्र नसतो की यंत्रमानव नसतो. आपल्या आयुष्यात प्लॅनिंग महत्त्वाचं तितकीच उत्स्फूर्ततात! आखीवरेखीव संकल्प-पालनाच्या युक्त्या माहीत असायला हव्यातच, पण मौजमजा करत, चुकत माकत, जुन्या परंपरा झुगारून नवे मार्ग शोध जगण्यातही गंमत असते ना!

विलक्षण शिस्तशीरपणे काम करणाऱ्या, काटेकोरपणे जगणाऱ्या लोकांची खरं म्हणजे भीतीच वाटते.
आपल्यावर कोणीतरी छडी घेऊन पहारा करतंय, संकल्पाप्रमाणे वागत नसल्यास शिक्षा करील, असं दडपण काय कामाचं? म्हणूनच संकल्प सोडण्यात मजा आहे तशी तोडण्यातही आहे. त्यामुळे एक जानेवारीपासूनचा म्हणून केलेला संकल्प अगदी आज तीन जानेवारीला मोडला असेल, तरी हरकत नाही. हाच संकल्प पुढल्या वर्षांकरता राखून ठेवू.. तोपर्यंतचे दिवस तर आपलेच आहेत.. जिओ जी भरके!     

डॉ. राजेंद्र बर्वे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
ब्रेक, वेग आणि नियंत्रण Print E-mail
यांच्या द्वारा - श्रीपाद कोठे, नागपूर   

लहानपणी सायकल शिकताना `ब्रेक हातात ठेवावा' हे वाक्य आपण किती तरी वेळा ऐकलेलं असतं. तसा तो ब्रेक हातात ठेवून सायकल शिकलेलीही असते. कालौघात ते सारे आपण विसरूनही जातो. `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व सत्य आहे आणि जीवनव्यापी आहे हे मात्र लक्षात येत नाही. आज सर्वत्र जे काही सुरू आहे, ऐकायला येते आहे, पाहायला मिळते आहे ते पाहिले की `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व वारंवार आठवते. विशेषत: अर्थकारणावरून आज जगभर जो हैदोस सुरू आहे तो पाहिला की, हे तत्व जीवनव्यापी सूत्र म्हणून पटू लागते.

आणखी वाचा...
 
ब्रुनो दि बेस्ट गिफ्ट - ( अमृता करकरे ) Print E-mail
यांच्या द्वारा - अमृता करकरे - लोकसत्ता   


alt‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांनी ‘ब्रुनो’ बंगलोरहून आणला होता. एक दिवस त्यांनी शिपायांना सांगितलं, मुंबई एअरपोर्टवर बंगलोरहून एक पार्सल येणार आहे ते घेऊन या. शिपाई ठरलेल्या दिवशी पहाटे पाच वाजता विमानतळावर गेले. बघतात तर काय - सुटाबुटातला एक माणूस बगलेत कुत्र्याचं छोटंसं पिल्लू घेऊन आला आणि त्यानं शिपायांना सांगितलं, ‘हे तुमच्या साहेबांना द्या’. शिपायाच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. हे पार्सल म्हणजे कुत्र्याचं पिल्लू असेल, असा पुसटसाही विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला नव्हता.

आणखी वाचा...
 
कुठे तरी, कुणी तरी! Print E-mail
यांच्या द्वारा - मंजिरी केळकर - लोकसत्ता   


altआयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर कुठे तरी कुणी तरी अडलेल्या रस्त्यावर योग्य मार्ग दाखवतो. कधी ती व्यक्ती ओळखीची असते, तर कधी अनोळखी; पण त्यामुळे जगण्याची वाट सहज सोपी होऊन जाते.

नेहमीसारखाच शनिवार उजाडला. उपवासाचा दिवस. मारुतीच्या देवळात जाऊन यायचं होतं. सकाळी लवकर देवळात जाण्याचा माझा शिरस्ता, पण आज मन थाऱ्यावर नव्हतं, याचं कारण म्हणजे आठवडय़ाभरात एकही गोष्ट मनासारखी होत नव्हती. मनात विचार आला की जाऊ दे, आपलं नशीब! दुसरं काय! या विचारातच देवळात शिरले. देवासमोर हात जोडले होते, पण मनापासून की?..

नारळ व हार वाहून प्रदक्षिणा घातल्या व बाहेर कठडय़ावर बसले. इतक्यात एक साडी नेसलेला तृतीयपंथी हार व तेल विकणाऱ्या माणसाला म्हणाला, ‘‘आप ये भगवान को चढाना.’’ त्याने पैसे दिले आणि पायरीवर नतमस्तक होऊन मनापासून नमस्कार केला. हात जोडून काही काळ उभा राहिला. मी हे सर्व पाहत होते. मनात विचार आला, काय मागत असेल तो परमेश्वराकडे? कुठलं मागणं की आभार..? आणि कशाबद्दल? हे पाहताना माझे डोळे पाणावले. मला माझीच लाज वाटली. ‘अरे, आपल्या मनासारखं झालं नाही तर किती अस्वस्थ झालो. नशिबाला दोष देत बसलो आणि याचं तर संपूर्ण आयुष्यच असं..?’ मी पुन्हा देवळात गेले. मनापासून हात जोडले. ‘परमेश्वरा, खरंच तू इथेच कुठे तरी माझ्या जवळपास आहेस. आज ‘कोणा’च्या तरी रूपात तू माझी चूक मला दाखवलीस. मी तुझी खूप आभारी आहे. आज मला जे दाखवलंस ते किती पारदर्शी होतं!’

आणखी वाचा...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

JPAGE_CURRENT_OF_TOTAL
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates