ललित
या सदरासाठी न्यू इंडियातील निवृत्त तसेच सध्याचे कर्मचारी या सर्वांना आवाहन आहे कि त्यांनी आपल्या रचना आमच्याजवळ यूनिकोड एनकोडिंग मध्ये तयार करून पाठवाव्यात.  तसेच जे सभासद आपल्या मंडळाकडे असलेले साहित्य, कथा वगैरे यूनिकोड मध्ये तयार करून देऊ शकतील त्यांनी कृपया This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it किंवा This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it वर संपर्क साधावा. आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे.

कल्याण डी. ओ. १७०५०० - MRO V - श्री सत्यनारायण पूजा Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   

दिनांक २३.१२.२०११ रोजी आपल्या कल्याण डी. ओ. १७०५०० - MRO V येथे श्री सत्यनारायणाची

पूजा संपन्न झाली..त्या दिवसाची ही काही प्रसन्न क्षणचित्रे...

0

1

आमचे Divisional Manager श्री. टोणपे साहेब

2

3

मनोभावे आरती करणारे आपले सहकारी

5

सौ. टोणपे mam ना D.O. तर्फे भेट देणा-या आपल्या सहकारी

6

MRO V चे रे Chief Regional Manager श्री. परांजपे साहेब

7

श्री. परांजपे साहेबांचे स्वागत करताना सौ. सुजाता शाक्यवार mam

8

सहका-यांशी संवाद साधताना श्री. परांजपे साहेब सोबत आपले श्री. टोणपे साहेब

9

छत्रपती श्री. शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरींचे अनावरण करताना श्री. परांजपे साहेब

10

11

12

13

14

15

16

17

18

neeta_2

19

20

पूजेनिमित्त आयोजित केलेला सुरेल भावगीतांचा कार्यक्रम - कल्याणचे श्री मंदार सोमण आणि त्यांचे सहकारी

21

22

23

24

आमचे छायाचित्रकार श्री. रवींद्र अमृते

 

 

सौ. रत्ना हिले - कल्याण

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

9820779672




.



 
'जगणं उलगडताना' पुस्तकाविषयी - ( रत्ना हिले ) Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   

आताच डॉ. संजय ओक यांचं 'जगणं उलगडताना' पुस्तक वाचून झालं. हे पुस्तक म्हणजे लोकसत्ताच्या पुरवणीमधून वेळोवेळी प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे. यापूर्वीही यातील काही लेख वाचनात आले होते ते पुन्हा वाचताना 'जुने काहीतरी ओळखीचे' भेटल्याचा आनंद झाला आणि काहींची नव्याने ओळख झाली.

सरांनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील नेहमीचेच प्रसंग चितारलेले आहेत..आपल्याही आयुष्यातील नेहमीचेच प्रसंग पण आपण त्याकडे सजगतेने, वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले की तेच आपल्याला वेगळे दिसू लागतात. कधी एखाद्या कठीण प्रसंगात, इतकी वर्ष आपण ज्यांना आपले मित्र म्हणवतो, त्यांचाच मुखवटा अचानक गळून पडतो आणि ते आपले हितचिंतक कधीच नव्हते याची जाणीव होते. अचानक एखादी वीज चमकून जावी तसे आपल्याला त्यांच्याविषयी काहीतरी लख्ख दिसून जातॆ..

माझ्याही आयुष्यात असेच काहीतरी घडले होते..मनाला क्लेशदायक ठरणारे असेच काही क्षण घेऊन मी पुढे चालणार  होते..माझ्या बाबतीत घडलेल्या प्रसंगानंतर रोजच संपर्क येणा-या त्या व्यक्तीशी मी कसे वागावे सुचत नव्हते..पण अंतरात्म्याचा आवाज आला काही काळासाठी माघार घे..विशेष काही घडले नाही असे भासू दे..यावर काळच याचे काय ते उत्तर देईल..

या प्रसंगानंतर योगायोगाने ओक सरांचाही 'माघार' या शब्दाचे सामर्थ्य दाखवणारा लेख वाचनात आला. त्यांनी आपल्या लेखात लिहिलंय "माघार ही हार नसते. माघार ही मिटून संपल्याची साक्षही नसते. माघार म्हणजे मागासलेपण नव्हे आणि माघार म्हणजे 'सीदन्ति मम गात्राणि, मुखंच परिशुष्यति' म्हणून गाळलेलं अवसानही  नव्हे. माघार अवसानघातकी नसून अवधानी चाणाक्षतेची चुणूक आहे, असं माझ मत आहे. माघार म्हणजे पराभव नव्हे तर लांबणीवर टाकलेला विजय आहे."

लेख वाचून झाल्यावर अचानक काहीतरी सापडल्यासारखं वाटलं...वाटलं आपला निर्णय योग्यच होता. माझ्याही बाबतीत घडलेल्या प्रसंगात त्या व्यक्तीला तिची चूक कळली असली तरी तिच्याकडे मनाचा एवढा मोठेपणा नव्हता की तीने आपली चूक कबूल करावी..मी तिच्याशी पूर्वीसारखीच सांघिक भावनेने वागते, तिच्या कामातील अडी-अडचणीत मदत करते..ती ही संवेदनशील असल्याने तिलाही आमच्यात वाढलेलं अंतर जाणवतं आणि माझ्याबरोबरच्या प्रत्येक प्रसंगात ती कणाकणाने पराभूत होत जाते.

असो, स्वतःविषयी खूप झालं..आता सरांच्या पुस्तकाविषयी...सरांचे सर्वच लेख छान आहेत, त्यातही 'मन्या' या बोक्याबद्दलचा लेख 'म्यांव', लीलावेली अम्माचा लेख 'सुंदर वृद्धत्व', 'साहब का करे? असेच इतरही लेख मनाला भिडतात..आपल्याला अंतर्मुख करतात..

मी वाचलं, वाचल्यावर सवयीनुसार लेकीलाही सांगितले..या लेखांमधून आलेला K.E.M. हॉस्पिटल आणि त्याच्या आसपासचा परिसर तिच्या नेहमीच्या पाहण्यातला..याच वर्षी तिला G. S. Medical college ला 'फ़िजिओथेरेपीला' admission मिळालं..डॉ. संजय ओक आधी लेखक म्हणून आणि आता संचालक (वैद्यकीय शिक्षण, प्रमुख रुग्णालये)-के.ई.एम. म्हणून त्यांच्याविषयीचा आदर अधिकच दुणावला..

सरांनी अनेक गरीब आणि गरजू लोकांच्या वैद्यकीय मदतीसाठी 'Poor Box Fund' ला आपल्या पुस्तकांच्या विक्री-मानधनातून मिळणारी सर्व रक्कम देणे, त्यांची साईट पाहिल्यावर जाणवणारे त्याचे मोठेपण ..त्यांच्याकडे चालत आलेले अनेक मानमरातब..त्यांनी मिळवलेल्या अनेक पदव्या, त्यांच्या कार्याची शासनाने घेतलेली दखल, अनेक बक्षीस, मा. श्री. अब्दुल कलाम यांच्या हस्ते स्वीकारलेला सन्मान आणि या सर्वापेक्षाही शब्दात कधीच न मांडता येणारे, त्यांना मिळालेले लोकांचे शुभाशीर्वाद..

त्यांचा ' Rope walk' लेख वाचून संध्याकाळी लेकीशी बोलताना तिला तिच्या अभ्यासासंदर्भात 'डोंबा-याच्या मुलीचे' उदाहरण दिले..सरांनी लिहिलंय " हा rope walk' च अस्तित्वाची लढाई आहे..दोरीचं दुसरे टोक गाठलं तर चार टाळया आणि आठ-बारा आण्यांची बक्षिशी आहे. आणि दुर्दैवाने लक्ष विचलित झालं, तोल गेला आणि पडून पाय मोडला तर...म्हणून जनहो कितीची गोंगाट होऊ दे; बसचा हॉर्न, रिक्षाचा भोंगा, पाठीमागच्या इमारतीचा slab टाकणारे मशीन या सगळ्याच्या पलीकडे डोंबारी-कन्येला दिसतंय ते फक्त दोरीचं दुसर टोक; आणि कानावर पडताहेत ते बापाने वाजवलेले चामड्याच्या हलगीवरचे कडाडणारे बोल..

तिला म्हटले तुलाही असाच अभ्यास करायचा आहे..अनेक प्रलोभन तुझ्या वाटेत येतील पण तुला तिकडे दुर्लक्ष करीत आपलं लक्ष्य गाठायचंय...तिला माझ बोलण पटत गेल्याची साक्ष तिच्या डोळ्यात दिसली आणि एक चांगले पुस्तक वाचल्याचे समाधान मनात उमटले..

सरांची website : www.sanjayoak.com

 

सौ. रत्ना संजय हिले
कल्याण (डी. ओ. १७०५००)

२.१२.२०११


 
साहस - शाळकरी मुलांना वाचविल्याचे समाधान (आशिष आजगांवकर) Print E-mail
यांच्या द्वारा - आशिष गोपाळ आजगांवकर   

aashish
९ मार्च १९९८ ची गोष्ट. नेहमीप्रमाणे मी सकाळीच ऑफिसला जायला निघालो. घरून साडेसात वाजता मी बाहेर पडलो. तेथून पावणे आठ वाजता बसने मी मालाड स्टेशनला पोहचलो. मी नेहमी ऑफिसला जाण्यासाठी मालाडहून ७.५३ ची बोरीवली ट्रोन पकडतो. त्या दिवशी सकाळी ट्रेनची वाट पहात मी उभा होतो. प्रथम ७.४६ ची ट्रेन आली व माझ्या समोरून निघून गेली. नंतर ७.५३ चा टाइमिंग इंडीकेटरवर लागला.

आणखी वाचा...
 
आमची येऊरची (ठाणे) भटकंती - (रत्ना हिले) Print E-mail
यांच्या द्वारा - सौ. रत्ना हिले   

260620111541

Forest orchid - Aerides maculosum

050620111475

सापकांदा - (याच्या देठावर सापासारखी नक्षी असते)

050620111481

पक्ष्यासारखं मुंग्यांनी झाडावर बांधलेले घर (प्यागोडा) या घराची रचना अशी असते की पावसाचा एक थेंबही आत जाउ शकत नाही

050620111482

050620111487

Wild Grapes च्या कळ्या

050620111489

काटेसावरीचे खोड

070520111372

100720111571

फुलपाखराचा कोष

100720111572

कुडा फुलांच्या शेंगा ( या आधी टोकाला जोडलेल्या असतात नंतर काही काळाने सुट्या होतात )

100720111575

अगदी पानासारखीच दिसणारी अळी

100720111576

कुडयाचे फुल

100720111580

मोळी किडा - हा किडा स्वतः भोवती मोळीसारखी रचना करून स्वतः चे संरक्षण करतो

100720111584

Wild Grapes

100720111585

100720111616

smilax

100720111588

निसर्गाची नवलाई - कपबशी (Cup & Saucer)

100720111591

श्यामीलिओन सरडा माझा मित्र

100720111596

100720111602

100720111608

100720111611

100720111615

050620111478

आमचा निसर्गभ्रमंतीचा group

100720111604

येऊरला भेटलेले सर्पमित्र सापांविषयी माहिती देताना (Blue cap)

100720111607

 

सौ. रत्ना हिले

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

(वरील सर्व फोटो माझ्या Nokia xpress music mobile मधून काढले आहेत)

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

sitechi_veni

Seetechi Veni (Marathi: सीतेची वेणी)

Orchidaceae (orchid family) » Rhynchostylis retusa (L.) Blume

rin-koh-STY-liss -- from the Greek rhynchos (beak) and stylis (small pillar)
re-TOO-suh -- rounded and notched tip

commonly known as: blunt rhynchostylis, foxtail orchid • Assamese: কপৌ-ফুল kopou phool • Coorgi: ಸೀತಾ ದಂಡೆ Sita-dande • Hindi: द्रौपदी माला draupadi mala • Kannada: ಸೀತಾ ದಂಡೆ Sita-dande • Konkani: panas koli • Malayalam: അണ്ണാന്‍താളി annaan thali • Manipuri: সমজীৰৈ samjirei • Marathi: गजरा gajara, सीतेची वेणी Seetechi veni • Nepali: ghoge gava • Oriya: pumam • Telugu: chintaranam

Native to: India, tropical Asia

आभार : Flickr

 

 





 

 
बहावा - Cassia Fistula- ( रत्ना हिले ) Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   

मी आणि माझी मैत्रीण नीता काल कुलाब्याच्या सागर उपवन किंवा BPT Garden ला जाऊन आलो...मेधा कारखानीस madam चा  sms आला आणि 'झाडांची ओळख' करून घेण्यासाठी आम्ही उत्सुकतेने गेलो आणि बरीच दुर्मिळ माहिती आणि या बहाव्याचे सोनेरी क्षण video मध्ये बंदिस्त करून आणले...ते सौंदर्य आपल्या वाचकांसाठी...

रत्ना हिले

आणखी वाचा...
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

JPAGE_CURRENT_OF_TOTAL
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates