कथा
हुश्शार आई! Print E-mail
यांच्या द्वारा - प्रियंवदा करंडे - लोकसत्ता   

monkey
एक माकड फळवाल्याकडे जांभळं गोळा करून देण्याच्या कामाला होते. फळवाला- महादूदादा त्या बदल्यात माकडाला कधी भाजलेल्या शेंगा द्यायचा तर कधी केळी द्यायचा. त्या दिवशी महादूदादाने माकडाला दिली पाच किलोची खमंग ताज्या गुळाची ढेप!

घरी आल्यावर माकडीण आणि त्यांचं एकुलतं एक गोजिरवाणं पिल्लू माँटो गुळाची ढेप बघून खूप खूष झालं. ‘माँटो बाळा, हे पाहिलंस का? गूळ आहे, ताजा ताजा!’ माकड म्हणालं.

आणखी वाचा...
 
स्वामी अ‍ॅन्ड फ्रेण्डस् - (आर. के. नारायण) Print E-mail
यांच्या द्वारा - आर. के. नारायण   

 

आर. के. नारायण यांच्या ‘स्वामी अ‍ॅन्ड फ्रेण्डस्’ या पुस्तकाचा मधुकर धर्मापुरीकर यांनी केलेला मराठी अनुवाद अलीकडेच प्रकाशित झाला. आमच्या छोटय़ा दोस्तांसाठी त्यातील एक कथा...

स्वामीनाथन मोठय़ा निग्रहानं सकाळी पाच वाजता झोपेतून उठला. मालगुडी स्टेशनला येण्यासाठी गाडीला आणखी अर्धा तास बाकी होता.. आणि चारच मिनिटांत ती गाडी राजमला कायमचं घेऊन निघून जाणार होती..

काल रात्री दहाच्या सुमारास मणीने येऊन सांगेपर्यंत स्वामीनाथनला याचा पत्ताही नव्हता की, राजमच्या बाबांची बदली त्रिचनापल्लीला झालेली आहे आणि ते उद्याच सकाळच्या गाडीनं सगळे निघून जाणार आहेत. उद्ध्वस्त झाल्याची जाणीव क्षणात स्वामीनाथनच्या मनात उभी राहिली होती.

आणखी वाचा...
 
खरा पराक्रम - ( King Philip II Augustus ) Print E-mail
यांच्या द्वारा - श्रीकांत नारायण - लोकसत्ता   

220px-Louis-Flix_Amiel-Philippe_II_dit_Philippe-Auguste_Roi_de_France_1165-1223

बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप ऑगस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वत: अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा - मग तो कोणीही का असेना - बसावा, हीच त्याची इच्छा होती.

आणखी वाचा...
 
वरकमाई Print E-mail
यांच्या द्वारा - गुरुनाथ तेंडुलकर, लोकसत्ता   


त्या टेबलावरचा तिचा आजचा पहिलाच दिवस. तसं हे काम तिला ठाऊक होतं. राठोडची असिस्टंट म्हणून तिनं पूर्वी काही आठवडे या टेबलाचं काम पाहिलं होतं. पण ते राठोडची असिस्टंट म्हणून. पेपर्स तपासून इनिशल करून, नीट फाईल करून ती राठोडकडे द्यायची आणि मग राठोड सावकाशीनं क्लायंटशी बोलून सही करायचा. स्टँप मारायचा. कामाचं स्वरूप तिला ठाऊक होतं. गेल्या वर्षी जवळजवळ महिनाभर तिनं राठोडच्या हाताखाली अगदी मन लावून काम केलं होतं. सगळे तपशील शिकून घेतले होते.

घरासाठी, दुकानासाठी, फॅक्टरीसाठी, छोटय़ामोठय़ा कारखान्यांसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांना त्यांचे कर्ज थकल्यानंतर थकबाकीदारावर कारवाईचा बडगा उचलण्याआधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या कचेरीत अर्ज करावा लागत असे. इथून क्लिअरन्स मिळाला की मग पुढची कारवाई. कोर्टाची कारवाई होण्यासाठी या ऑफिसातून शिक्का मिळणं महत्त्वाचं.

आणखी वाचा...
 
भिमा Print E-mail
यांच्या द्वारा - डॉ. प्रल्हाद कुलकर्णी , लोकसत्ता   


दुपारची भर उन्हाची वेळ. शेतातली ज्वारी कापून झालेली. नांगरणीसुद्धा होऊन गेलेली. आता पुढील हंगामासाठी रानाची मशागत करणे महत्त्वाचे होते. गावाबाहेरच्या हद्दीजवळ असलेल्या बामणाच्या मळ्यांत नांगरणीमुळे वर आलेले ज्वारीचे सड भिमा गोळा करीत होता. मधूनच कापून तंबाकूची पानं पालथी घालून वाळविण्यास ठेवलेल्या जागेकडे पाहात होता. तसं वावर १५-२० एकराचं. त्याच्या आज्या-पणज्यापासून त्यांच्या कडंच. मोटच्या धावपट्टीलगतच्या अध्र्या एकरांत आंब्याची झाडं उभी होती. या बामणाच्या मळ्याला लागून पश्चिमेच्या बाजूला देशपांडकी, पूर्वेला तोडकरचा मोठा मळा. भिमाच्या मळ्याला लागूनच छोटा ओढा. झाडाझुडुपांनी आच्छादलेला. त्याचा प्रवाह थोडा आटलेला. येऊ घातलेल्या कडक उन्हाळ्याची ती नांदीच होती. मधूनच एखादी वावटळ भिरभिरत येई.

आणखी वाचा...
 
अनोखी भेट Print E-mail
यांच्या द्वारा - संकलित   

अनोखी भेट
गुजराथचे राजे भीमदेव. त्यांचा परराष्ट्रमंत्री डामर. वय पोरसवदा. पण अतिशय बुद्धिमान. महत्त्वाच्या कामगिरीसाठी त्याला राजा भोज याच्या दरबारी पाठवायचे होते. तेथे कसे वागायचे, विषय कसा काढायचा, मुद्दे कसे मांडायचे वगैरे अनेक सूचना त्याला भीमदेवाच्या दरबारातील वृद्ध मंडळींनी दिल्या. डामर याने मुकाटय़ाने सर्वाचे बोलणे ऐकून घेतले. मग तो उठून उभा राहिला आणि उपरणे झटकून म्हणाला, ‘बरे आहे. ऐकले सगळे मी.’ त्यावर राजा भीमदेव यांनी विचारले, उपरणे कशासाठी झटकलेत? डामरने उत्तर दिले, ‘भोज राजाकडे जाताना मी स्वतची बुद्धि बरोबर घेऊन जाणार आहे. उपरणे झटकून मी सर्वानी दिलेले उपदेशही झटकून टाकले.’ या उत्तराने दरबारी मंडळी थोडीशी नाराज झाली.

 

आणखी वाचा...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

JPAGE_CURRENT_OF_TOTAL
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates