|
यांच्या द्वारा - प्रसाद
|
|
मराठी वाङ्मय मंडळ विस्तारित शाखा- न्यू इंडिया सेंटरची ही साईट सर्व सभासदांसाठी तयार केली आहे. सर्व प्रकार चे लेख उदा. प्रवासवर्णनं, ललित, कथा ह्यांचं आम्ही स्वागत करू. सभासदांच्या लेखनाला उत्तेजन देणं हा या साईटचा मूळ हेतू आहे. नेट वर इतरत्र वाचलेले चांगले लेख व इतर साहित्य प्रकारांचही स्वागत आहे. पण असे लेख देताना मूळ वेबसाईट चा तसेच लेखकांचा जरूर उल्लेख असावा. उत्तमोत्तम मराठी साहित्य आपल्या सभासदांना वाचावयास मिळावं हा एक महत्वाचा हेतु ही वेबसाईट तयार करताना आहे. आम्ही सर्व सभासदांना आवाहन करत आहोत की त्यांनी आपले सहकार्य आम्हाला करावे. ह्या वेबसाईट साठी वेळ देणा-या लोकांची आम्हाला अत्यंत गरज आहे. ज्या सभासदांना शुद्धलेखनाची जाण असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा. या व्यक्तिंना ह्या वेबसाईट साठी लेख लिहायचे असतील त्यांनी कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वर संपर्क साधावा. फक्त यूनिकोड एनकोडींग वापरून लिहिलेला लेख ग्राह्य धरला जाईल. यूनिकोड च्या स्थापनेसाठी कृपया Font Problem हे मुख्य पानावरील सदर वाचावे. |
|
|
यांच्या द्वारा - प्रसाद
|
|
आज दिनांक 12.9.2008 रोजी ह्या वेबसाईट मध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. आज काही निवडक व्यक्तिंना ह्या साईट मध्ये लेख लिहिण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या व्यक्तिंना ह्या वेबसाईट साठी लेख लिहायचे असतील त्यांनी कृपया
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वर संपर्क साधावा. फक्त यूनिकोड एनकोडींग वापरून लिहिलेला लेख ग्राह्य धरला जाईल. यूनिकोड च्या स्थापनेसाठी कृपया Font Problem हे मुख्य पानावरील सदर वाचावे. |
|
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर
|
|
आज दिनांक 10.9.2008 रोजी मराठी वाङ्मय मंडळाच्या न्यू इंडिया सेंटर येथील विस्तारीत शाखेचे दोन खंदे समर्थक श्रीमती रत्ना हिले व श्री राजेश कदम टी.एम.पी. मूळे आमच्यापासून दुरावले. श्री राजेश कदम ह्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहिले आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वामूळे विस्तारित शाखेची प्रगती झपाट्याने झाली. विस्तारित शाखेचा हिशोब त्यांनी समर्थ पणे सांभाळला. श्री राजेश कदम ह्यांची बदली प्रधान कार्यालयात झालेली असल्यामूळे मराठी वाङ्मय मंडळाला त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिल. श्रीमती रत्ना हिले ह्यांनी अतिशय मेहनत घेउन ग्रंथालयाची निगा राखली. त्यांच्या मिश्किल स्वभावामूळे सर्व सभासदांमध्ये त्या लोकप्रिय झाल्या. ग्रंथपालाची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे निभावली. आजही ही वेबसाईट बनवण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. मराठी वाङ्मय मंडळाच्या न्यू इंडिया सेंटर येथील विस्तारीत शाखेच्या वतीने तसेच सर्व सभासदांच्यावतीने आम्ही त्यांचे आभार मानतो; त्यांचे ऋण आमच्यावर नेहमीच राहिल. |
|
|
|
|
|