कुतूहल
ओल्गा राणीचा सूड Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   


पहिल्या शतकाच्या प्रारंभी रशियात स्लॉव्ह वंशाच्या लोकांची वस्ती होती. स्कँडिनेव्हियातून नॉर्मन लोकही उत्तर रशियात राहावयास आले. शेजारी देश फिनलॅण्डमार्गे हे लोक रशियात आले. फिनलॅण्डचे लोक त्या नॉर्मन टोळ्यांना ‘रस’ असे म्हणत. त्या रस लोकांची वस्ती नंतर पश्चिम रशियात वाढल्यावर त्या प्रदेशाला रशिया असे नाव पडले, असे म्हटले जाते.

सातव्या शतकात काहार या जमातीच्या टोळ्यांचाही रशियात उदय झाला. नवव्या शतकात रूरिक याने किएव्ह राज्य स्थापन केले. ९ व्या ते १२ व्या शतकांत अनेक प्रदेश जिंकून त्यांनी राज्याची बरीच वाढ केली. त्या काळात ब्लादिमीर व इआरोस्टॉव्ह राजे प्रभावी होते. तेराव्या शतकाच्या मध्यावर मंगोल टोळ्या वारंवार आक्रमणे करून किएव्हराजांना त्रास देऊ लागले. त्या वेळी इगार हा राजा ड्रेव्हलीन टोळ्यांकडून मारला गेला. त्यानंतर त्याची राणी ओल्गा राज्य पदावर आली.

इगॉर या आपल्या नवऱ्याला या टोळ्यांनी मारल्याचे दु:ख तिला सतत सलत होते. त्या काळी ड्रेव्हलीन टोळीवाले बांबू व गवताच्या झोपडय़ात राहत. धनुष्यबाण हे त्यांचे शस्त्र. गुरे पाळणे हा व्यवसाय तर चिमण्या व कबुतरे पाळणे हा सर्व टोळीवाल्यांचा शौक होता. या पक्ष्यांना ते सांकेतिक भाषा शिकवीत. हल्ला करावयाच्या वेळी हे पक्षी फार उपयोगी पडत.

नुकतीच राजेपदावर आलेली ओल्गा नवखी म्हणून हाताखालचे लोक जुमानीत नसत. राणीने हुशारीने ड्रेव्हलीन टोळीबरोबर युद्ध न करता तह केला. तहात तिने ड्रेव्हलीन टोळ्यांमधील प्रत्येक घरामागे एक कबूतर व एक चिमणी मागितली. तसे पक्षी मिळाल्यावर रात्री पक्ष्यांच्या पायांना जळते लहान पलिते बांधून पक्ष्यांना उडवून दिले.

जिवाच्या आकांताने ते पक्षी त्यांच्या त्यांच्या बांबू, गवताच्या घरांवर जाऊन फडफडू लागले. ड्रेव्हलीन लोकांना हे काय होतंय हे कळेपर्यंत त्यांची घरे जळून भस्मसात झाली होती. ओल्गा राणीने अशा अभिनव मार्गाने ड्रेव्हलीन लोकांचा सूड घेतला. याच ओल्गा राणीने रशियात प्रथम ख्रिश्चन धर्म स्वीकारला.                       

सुनीत पोतनीस
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
London Fireworks 2012 New Years Eve!!!!! Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
 
नववर्षाच्या हिरव्यागर्द शुभेच्छा ! Print E-mail
यांच्या द्वारा - श्री. अनिल एस. शिंदे - जळगाव   

Anil_Shinde_poem

 

सौ. हिले मॅडम,

सस्नेह नमस्कार!

आपण व परिवारास नवीन वर्ष सुखा-समाधानाने जावो, ही प्रभूचरणी विनम्र प्रार्थना! असो.

मॅडम, सोबत ग्रीटींग पाठवित आहे. सदर ग्रीटींग आपल्या साइटवर अपलोड करून निसर्गावर आधारीत हा संदेश जगभर पोहचवावा, ही न्रम विनंती.

कळावे. धन्यवाद!

स्नेहांकित,

अनिल शिंदे, जळगाव

9922727190
 
२०१२ - नववर्षाचे स्वागत Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
shubhechha
 
चहाच्या कपातही सौंदर्य... Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
chaha
 
Why This Kolaveri..Kolaveri..Kolaveri..Di..( ऱ्हिदम करेक्ट.. मेण्टेन प्लीज.. ) Print E-mail
यांच्या द्वारा - विनय उपासनी - लोकसत्ता   

रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक हवी का नको, टूजीचं काय चाल्लंय काय कळतच नाय यार, अण्णा पण आता काहीबाही बोलायला लागलेत, लोकपालचं काय होतंय कोणास ठाऊक, क्रिकेटचं काय आता ते चोवीस तास बाराही महिने चालू असतं, डोक्यात जातं ते. फेसबुकवर पण काय तेच तेच.. नाक्यावरपण आता राम नाही राहिला.. सारी पोरं चिकटलीत इकडे तिकडे.. पोरी पण आता सूममध्ये असतात.. अशा या वातावरणात यू टय़ूबवर कोलावेरी डी पडलं.. यंगिस्तानमध्ये एकच तहलका झाला. जो तो कोलावेरी कोलावेरीच बोलायला लागला. वातावरणात एकदम चेंज झालंय सांगतोय, विनय उपासनी.

हाय गाइज.. यो बॉइस.. नो आय मीन बॉइज.. काही तरी चुकतंय का.. चुकलं तर प्लीज डोण्ट कोलावेरी हां.. अरे, कोलावेरी.. हा हा आत्ता आठवलं.. बरोब्बर कोलावेरी.. कोलावेरी.. कोलावेरीच.. सध्याचं यूथ अँथेम. कॉलेज कट्टय़ांवर, नाक्यानाक्यावर, ऑफिसांत, प्लॅटफॉर्मवर, गाडीत आणि अगदी घरातसुद्धा.. यत्र तत्र सर्वत्र सध्या कोलावेरीची धूम सुरू आहे.. गाडीत बसलात की तुमच्या समोर पाचपकी तिघेजण तरी कानात मोबाइलचा ‘हँड्स फ्री’ अडकवून कोलावेरीचं हमखास पारायण करत असतात.. खिडकीच्या बाहेर बघत उगाच हसत कोलावेरीच गुणगुणत असतात.

तीन-चार आठवडय़ांपासून कोलावेरीची ही साथ सुरू झाली आहे. या साथीला सुरुवात झाली ती यू टय़ूबपासून. कम्प्युटर, आयपॅड, आयपॉड, नेटबुक, फेसबुक, टॅब्लेट, या सर्वाना नाक लावून बसलेल्या आपल्या यप्पी क्राऊडच्या कानात कोलावेरी डी ची ही जादू शिरली आणि बघता बघता प्रत्येकाच्या कानात कोलावेरीचं हे वारं शिरलं. आता हे कोलावेरी पुराण छापून येईपर्यंत नक्कीच यू टय़ूबवर या यूथ अँथेमनं हिट्सचा दोन-तीन कोटीचा आकडा पार केला असेल, यात शंकाच नाही. बरं कोलावेरीची ही साथ देशातच नव्हे तर अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातही पसरली आहे. केवळ दिलफेक आशिकच नव्हेत तर अनेकांच्या ओठी कोलावेरी सहज रुळलंय, ते केवळ त्याच्या सहजसोप्या शब्दांनी (बाय द वे, डर्टी पिक्चरमधलं ऊ ला ला ऊ ला ला हेही काही कमी नाही) पण असो तो आपला विषय नाही. कोलावेरी डी आहे ना.

व्हॉट्स धिस कोलावेरी

आता कोलावेरी डी म्हणजे काय हे सांगायला नकोच. माहितीच्या महाजालात एका क्लिकवर त्याविषयीचे अर्थ-अन्वयार्थ सापडतील. तरी पण सांगतोच, कोलावेरी डी म्हणजे ‘का गो बाय तू एवढी रागावलीएस’.. म्हणजे हे झालं आपल्या माय मराठीत.. राष्ट्रभाषेत सांगायचं म्हणजे ‘तुम इतना गुस्सा क्यू हो’.. आता प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतात. मग राग आला तर काय एवढं असं आपण म्हणतो. पण थांबा राजे हो.. त्याचं काए की राग येनं आनि त्ये बी मुलींना त्यातही गोऱ्या गोऱ्या मुलींना राग येनं म्हंजी बाबाबाबाबाबाबा.. सॉरी हं, आपलं उगाच गावची आठवण झाली म्हणून थोडं भाषान बदललं.. तर या गाण्याचं तेच आहे.

सूप बॉइस

तसं तर या गाण्याचे गीतकार-कवी- आपल्याला पहिल्चाच फटक्यात सांगून टाकतात की बाबांनो हे गाणं निर्थक आहे (सूप साँग).. सूप साँग, फ्लॉप साँग आहे. तरीही हे गाणं सुपरडुपर हिट झालंय.. का बरं बाबा.. तर हे गाणं आहे सूप बॉइजसाठी.. आता सूप बॉइस आय मीन बॉइज म्हणजे काय.. तर जे दिलफेक आशिक आहेत. ‘व्हाइट स्कीन्न गर्ल’च्या मागे मागे फिरतात पण त्यांना कोणी भाव देत नाहीत. मुली त्यांना उडवून लावतात. मग निराश झालेल्या या पोरांना त्यांची मित्रमंडळी चिडवतात. या मित्रमंडळीत दोस्तांना, म्हणजे अगदी खास दोस्तांना बरं का, ‘मामा’ (आता आपल्याकडेही अशी अनेक नावं असतील..) अशी हाक altमारण्याची चेन्नईत पद्धत आहे. तर अशा या सूप बॉइसना ‘ट्रिब्युट’ म्हणून कोलावेरी डी रचण्यात आलंय.

धनुषचं धनुष्य

प्रेमात पडलेल्या पण तोंडावर आपटलेल्या मुलांना धीर मिळावा म्हणून कोलावेरीचं हे धनुष्य रजनीकांतच्या जावयानं-धनुषनं- उचललं. कोलावेरी ठीक आहे. पण डी म्हणजे काय.. तर चेन्नईत सहसा मित्रमंडळी एकमेकांशी बोलताना वाक्याच्या शेवटी डा लावतात. पण मुलगी असेल तर वाक्याच्या शेवटी डी लावला जातो. म्हणूनच व्हाय धिस कोलावेरी डी म्हणजे तू एवढी काय रागावतेस गं..

टँग्लिश म्हणजे काय?

रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या हिच्या दिग्दर्शनाखाली थ्री नावाचा पिक्चर तयार होतोय. या चित्रपटासाठी गायलेलं हे गीत टँग्लिश पद्धतीचं आहे. आता टँग्लिश म्हणजे तमिळ अधिक इंग्लिश. तामिळनाडूत भाषेची अस्मिता फार आहे. त्यामुळे इंग्लिश बोलतानाही तिला तमिळमध्येच घोळलं जातं. म्हणजे असं बघा की, कोणतंही इंग्लिश वाक्य बोलताना त्याच्या अखेरी ‘अ’ लावायचा, की झालं टँग्लिश. उदा  गर्लअ, गर्लअ, वाइट्ट वाइट्ट (व्हाइट व्हाइट), नाइट्ट नाइट्ट, स्किन्न इइ.

चेन्नईतल्या एका स्टुडिओत चित्रीत झालेल्या या गाण्यात काही तमिळ शब्दही आहेत. जसं की मामा नोट्स उडतलो, अपडे स्नॅक्सवुडतलो.. कोलावेरी कोलावेरी डी गाताना गायक म्युझिक कम्पोझरला एका हातात नोट्स आणि दुसऱ्या हातात स्नॅक्स घेत गाणं ऐकण्याचा आनंद लुटण्यास सांगतोय.. मी मस्तच गातोय ना (सिरिया आवासे) असंही तो गाता गाता विचारून टाकतो. मध्येच गाण्याची टय़ून चेंज करायला सांगून बॅचलर लाइफमध्ये येऊन परत गेलेल्या मुलीमुळे डोळे कसे पाणावतात याची हकीकत गायक स्पष्ट करतो. आणि अखेरीस सूप बॉइज आपल्याला काही चान्स नाही यार, असं सांगून गायक पुन्हा कोलावेरी डी करतो.

अनिरुद्ध..

बरं या गाण्याचं कौतुक होतंय ते त्याचं संगीत, गीतरचना आणि गायकी यामुळे. गायक आणि गीतरचना अर्थातच अभिनेता धनुषचं (रजनीकांतचा जावईच ना तो.. यन्ना ही कॅन डू ऑल द िथग्ज, माइण्ड इट्ट). या गाण्याला संगीतबद्ध केलंय अनिरुद्ध रविचंदर याने. अवघ्या अठरा वर्षांच्या या लिटिल मास्टरने कारकीर्दीच्या दुसऱ्याच चित्रपटातील संगीताच्या माध्यमातून एवढी लोकप्रियता मिळवली आहे. कोलावेरी डीच्या संगीतामुळे त्याचं नाव आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय हे नक्की.

निरर्थक तरीही..

तर असं हे गाणं तसं पहायला गेलं तर निरर्थक, अर्थहीन तरीही लोकप्रिय. अर्थात निरर्थक गाणं लोकप्रिय होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. परंतु प्रत्येक गाणं हे आपलं नशीब घेऊन जन्माला आलेलं असतं. तसाच काहीसा हा प्रकार आहे. कोलावेरीवर जशी स्तुतिसुमनं उधळली जातायंत तशीच त्यावर टीकाही होत आहे. होतंच असं. एखाद्याचं राष्ट्रीय स्तरावर कौतुक सुरू झालं की त्याच्यावर आगपाखड करणारे पाखंडी पुढे येतातच, ती तर दुनियेची रीतच आहे. पण मग ‘हर दिल के आशिक को कुरेदनेवाला गाना’.. प्रत्येक वेळी थोडीच येत असतं. ‘जाए तो जाए कहाँ’ असं म्हणत या प्रेमभंगवीरांनी आपलं दुख किती वेळा कुरवाळत बसायचं. त्यांनी altत्यांच्या भावना मोकळय़ा केल्या तर काय झालं. त्यात एवढं राग येण्याचं कारणंच काय, व्हाय धिस कोलावेरी आँ..

इसंदा रागानम..

राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी दूरदर्शनवर अनेक वर्षांपूर्वी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे गाणं प्रसिद्ध झालं होतं, आठवतंय? त्यात देशातील विविध भाषांमधून हे गाणं गायलं गेलं होतं. आजही मिले सूर.. ची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. तमिळमध्ये या गाण्याचे बोल काहीसे असे होते.. इसंदा नम वेरुगले रागानाम, इसंदा रागानम आरुगले.. म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा.. नद्यांच्या-धरणांच्या पाणीवाटपावरून, कधी भाषेच्या मुद्यावरून तर कधी स्वतंत्र बाण्यामुळे राज्याराज्यांमध्ये तेढ निर्माण होत असतानाच संगीत आणि गाण्यामुळे देश एकत्र आल्याचे चित्र नक्कीच सुखावह आहे. नाही तर दक्षिण भारतात गायलं गेलेलं गाणं यूपी-बिहारमध्ये लोकप्रिय झालं असतं का ? नाही ना.. हीच तर ताकद आहे संगीतामध्ये.. इसंदा रागानम.. (मिले सूर मेरा तुम्हारा..) म्हणतात ते उगाचच नव्हे.
तेव्हा दिलखुलासपणे गा..

व्हाय धिस कोलावेरी, कोलावेरी, कोलावेरी डी..
ऱ्हिदम करेक्ट.. मेण्टेन प्लीज..

yo boys i am singing song

soup song

flop song

why this kolaveri kolaveri kolaveri di

why this kolaveri kolaveri kolaveri di
rhythm correct

why this kolaveri kolaveri kolaveri di
maintain please

why this kolaveri..di

distance la moon-u moon-u

moon-u  color-u  white-u

white background night-u nigth-u

night-u color-u black-u

why this kolaveri kolaveri kolaveri di

why this kolaveri kolaveri kolaveri di

white skin-u girl-u girl-u

girl-u heart-u black-u

eyes-u eyes-u meet-u meet-u

my future dark

why this kolaveri kolaveri kolaveri di

why this kolaveri kolaveri kolaveri di

maama notes eduthuko

apdiye kaila snacks eduthuko
pa pa paan pa pa paan pa pa paa pa pa paan
sariya vaasi

super maama ready

ready 1 2 3 4

whaa wat a change over maama

ok maama now tune change-u

kaila glass

only english..

hand la glass

glass la scotch

eyes-u full-aa tear-u

empty life-u

girl-u come-u

life reverse gear-u

lovvu lovvu

oh my lovvu

you showed me bouv-u

cow-u cow-u holi cow-u

i want u hear now-u

god i m dying now-u

she is happy how-u

this song for soup boys-u

we dont have choice-u

why this kolaveri kolaveri kolaveri di

why this kolaveri kolaveri kolaveri di

why this kolaveri kolaveri kolaveri di

why this kolaveri kolaveri kolaveri di

flop song

---------------

 

शुक्रवार , ९ डिसेंबर २०११
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

लोकसत्ता

 
आपली मुंबई नेहमी अशीच राहो ! - ( Flash Mob Dance) Print E-mail
यांच्या द्वारा - रत्ना हिले   
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरची गर्दी संध्याकाळी वाढू लागली.. रविवारचा दिवस असला, तरी गाडय़ांची ये-जा आणि गाडय़ा पकडण्यासाठी प्रवाशांची धांदल मात्र नेहमीसारखीच होती. फलाटावरच्या मोठय़ा घडय़ाळाचा मोठा काटा कष्टाने हलून पुढे सरकला, आणि लहान काटय़ाजवळच येऊन थांबला. पाच वाजून २५ मिनिटे झाली होती.. उद्घोषणांचा गजर थांबला.. गर्दीच्या गजबजाटात ही शांतता आधी कुणाला समजलीच नाही.. पण स्टेशनवरच्या सराईतांना मात्र हा वेगळेपणा जाणवला. काही नजरा त्या वेगळेपणाचा वेध घेऊ लागल्या..

आणखी वाचा...
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

JPAGE_CURRENT_OF_TOTAL
Type in:

आपलं स्वागत



RocketTheme Joomla Templates