|
यांच्या द्वारा - प्रसाद साखरकर
|
|
आमच्या या उपक्रमाला मनापासून दाद देणा-या हजारो वाचकांना धन्यवाद ! सप्टेंबर २००८ च्या महिन्यात सुरू झालेली ही वेबसाईट सप्टेंबर च्या अखेर पर्यंत १४० वाचकांना आकृष्ट करु शकली. हळू हळू मौखिक प्रचारा द्वारे ह्या वेबसाईट ची वाचकसंख्या डिसेबंर २००८ पर्यंत १,०४,५२२(फक्त डिसेंबर मध्ये ३४,२७३) वाढली. आमच्यावरच्या वाचकांच्या ह्या प्रेमामुळेच अधिकाधिक चांगलं साहित्य आपणांपर्यंत पोचवण्याचा आमचा निर्धाराला बळ मिळतं. खरं तर ही वेबसाईट न्यू इंडिया च्या वाङ्मय मंडळाच्या सभासदांना चांगलं साहित्य वाचायला मिळावं म्हणून तयार केली. पण न्यू इंडिया च्या कार्यालयात बॅण्डविड्थ च्या कमतरतेमुळे ती कार्यालयातून बघताच येत नाही. तरीही आम्ही (संपादिका - रत्ना हिले व मी) नेटाने आपलं काम करत राहिलो. मी तांत्रिक बाबी बघतो व मॅडम वाचनीय साहित्य उपलब्ध करून देतात. आमच्या ह्या प्रयत्नांना मात्र सर्व मराठी प्रेमींचं पाठबळ मिळालं. सर्वात आश्चर्यचकित तर मी झालो. कारण भारतातून फार कमी वाचकांनी वेबसाईटला भेट दिली पण तुलनेने कितीतरी जास्त लोकांनी अमेरिकेतुन भेट दिली आणि सतत वाचकांचा आकडा वाढतोच आहे. ह्या वेबसाईट ची प्रगती आपल्या सर्वांसमोर मांडायला मला खुप आनंद होतोय देश
| फक्त डिसेंबर 2008 मध्ये ह्या वेबसाईटला भेट देणा-या वाचकांची संख्या | US
| 32,534
| India
| 957
| Australia
| 527
| Sri Lanka
| 61
| Hong Kong
| 95
| Italy
| 46
| Other Countries
| 53 |
|